साकोली नगर परिषद कार्यालयातील ई-वाहन प्रदर्शनीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

309

The गडविश्व
भंडारा : नगर परिषद साकोली कार्यालयात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 23 फेब्रुवारीला ई-वाहन प्रदर्शनी भरविण्यात आली. याअंतर्गत स्थानिक ई-वाहन विक्रेत्यांसोबत संपर्क करून नगरपरिषदेच्या आवारात विविध कंपनीच्या E-vehicle ची प्रदर्शनी भरविण्यात आली. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यात आली. जास्तीत जास्त लोकांनी पेट्रोल/डीझेल ची वाहने न वापरता इलेक्टिक वर चालणारी वाहने वापरणे संबंधी आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले.
प्रदर्शनीला दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे तसेच साकोली शहरातील नागरिक विजय दुबे व इतर 4 नागरिकांनी प्रदर्शनी मध्ये ई-वाहनाची बुकिंग केलेली आहे. तसेच नगर परिषद साकोलीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केलेला आहे. यामध्ये न. प. साकोली येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद ई-वाहन खरेदी करिता बिनव्याजी कर्ज देणार आहे. यामुळे कर्मचारी सुद्धा या उपक्रमाचा लाभ घेऊन ई-वाहनाची खरेदी करतील.
यासोबतच न. प. साकोली ने कार्यालयीन आवारात नागरिकांचे ई-वाहन चार्जिंग करिता चार्जिंग स्टेशन बनविले आहे. हे चार्जिंग स्टेशन नागरिकांसाठी 24×7 मोफत उपलब्ध राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ई- वाहन खरेदी करावे व उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके यांचेमार्फत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here