The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑगस्ट : जिल्हयात सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांचेमार्फत सर्वेक्षणाची विशेष मोहीम १५ ऑगष्ट २०२२ ते १५ सप्टेंबर, २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
सहकार आयुक्त़ व निबंधक, सहकारी संस्था, म. रा.पुणे यांचे कडील, १ ऑगस्ट २०२२ रोजीचे परिपत्रकान्वये कागदोपत्री असलेल्या/बंद/कार्यस्थगीत संस्था व लेखापरिक्षण न झालेल्या सहकारी संस्थांचे, १५ ऑगष्ट २०२२ ते १५ सप्टेंबर, २०२२ या कालावधीत जिल्हयातील सहकरी खात्यातील अधिकारी/कर्मचारी यांचे मार्फत संपुर्ण जिल्हयात सर्वेक्षणाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानंतर सर्वेक्षणा अंती कागदोपत्री/बंद/कार्यस्थगीत आढळलेल्या सहकारी संस्थांवर संबंधीत संस्थांचे निबंधक हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्या खालील नियम १९६१ तसेच उपविधी मधील तरतुदीनुसार वैधानिक कार्यवाही करणार आहेत. असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, गडचिरोली पी.एस. धोटे यांनी कळविले आहे.