सर्वोदय वार्डातील नाली बांधकाम पुर्णत्वास : मात्र मार्ग बंद

307

– अवागमणासाठी पर्यायाी मार्गाचा वापर
The गडविश्व
गडचिरोली : शहरातील आरमोरी मार्गावरील सर्वोदय वार्ड क्रं.३ मध्ये वैनगंगा पतसंस्थेच्या मागील परिसरात गिरडकर यांच्या घरापासून ते चौधरी यांच्या घरापर्यंत नगर परिषदेच्या वतीने नाली बांधकाम करण्यात आले. सदर काम पुर्ण होवून १५ ते २० दिवसांचा कालावधी लोटूनही सदर मार्ग बंद आहे. परिणामी ये-जा करण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.
आरमोरी मार्गावरील सर्वोदय वार्ड क्र. ३ मधील वैनगंगा पतसंस्थेच्या मागील परिसरात गेल्या अनेक वर्षापासून नाली नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. यासंदर्भात अनेकदा निवेदणे व पाठपुरावा केल्यानंतर सदर नाली बांधकाम मागील माहिन्यात पुर्ण करण्यात आले. नाली बांधकाम पुर्ण होऊनही नाली उंच व रस्ता खोलगट असल्याने येथील नागरिकांना वाहनाने मार्गक्रमण करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अवागमन करण्याकरिता संताजी सभागृहाकडील पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. तसेच नाली बांधकामाकरीता वापरण्यात आलेली गिट्टी तसेच गाळ हा देखील रस्त्यावर असल्याने ये-जा करण्यास अडचण निर्माण होत आहे. नगरप्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदर मार्ग सुरू करून द्यावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here