– कान नाक आणि घसा यासंबंधित आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी कॅम्प चे आयोजन
THE गडविश्व
गडचिरोली : चातगाव येथील ‘सर्च’ रूग्णालयाअंतर्गत ईएनटी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कॅम्प १५ जानेवारी व १६ जानेवारी २०२० रोजी होणार असून या कॅम्पमध्ये कान,नाक आणि घसा यासंबंधित आजार असलेल्या लोकांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
‘ सर्च ‘ ने याआधीही कान नाक व घसा यासंदर्भातील आजारासाठी कॅम्पचे आयोजन केले होते. नागपूर येथील डॉ. अजय देशपांडे हे रूग्णांवर शस्त्रक्रिया करणार आहेत.’सर्च हॉस्पिटल मधील ईएनटी विभागाची जबाबदारी डॉ. गिरीश देशपांडे यांच्याकडे आहे.१५ आणि १६ जानेवारी रोजी होणाऱ्या या कॅम्पचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन ‘सर्च ‘कडून करण्यात आलं आहे.