सर्च येथे सांधेदुखी, गुडघेदुखी व हाडांचे फ्रॅक्चर वर होणार उपचार

137

– २० जुलै रोजी होणार पहिली ऑर्थोपेडिक ओपीडी

The गडविश्व
गडचिरोली : सांधेदुखी, गुडघेदुखी व हाडांचे फ्रॅक्चर या समस्या दैनंदिन जीवन जगणे कठीण करतात. वाढत्या वयाच्या लोकांमध्ये मध्ये हि समस्या वाढतच आहे. गुडघेदुखी, सांधेदुखी म्हणजे विश्रांती करत असताना,चालताना किंवा दैनंदिन काम करत असताना वेदना होतात. ‘सर्च’येथील माँ दंन्तेश्वरी दवाखान्यात आता ऑर्थोपेडिक ओपीडी ची सुरुवात करण्यात आली असून हि सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचवण्या साठी नागपूरचे तज्ञ डॉ.आदित्य केकतपुरे आणि डॉ. आशय केकतपुरे हे बुधवार २० जुलै २०२२ रोजी सर्च येथे उपस्थित राहणार आहेत.
गुडघे दुखण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यात काही धोक्याची चिन्हे हि असू शकतात. गुडघे दुखीची कारणे सतत दुखापत, शारीरिक इजा, सांध्यांचे संक्रमण, गाऊट, सांधेदुखी हे असतात . या मधील कोणते त्रास आपणास असल्यास सर्च दवाखान्यात अवश्य यावे. गुडघे शारीरिक क्रियांसाठी तसेच दैनंदिन कामांसाठी महत्त्वाचे असतात. जर त्यांची काळजी घेतली नाही तर ते त्यांचा उद्देश गमावू शकतात आणि कायमचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच माँ दंतेश्वरी रुग्णालयात येत्या २० जुलै रोजी येऊन आपल्या सांधेदुखी, गुडघेदुखी व हाडांचे फ्रॅक्चर या समस्यांवर तज्ञांकडून तपासणी आणि उपचार करून घ्यावे व या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here