संतापजनक : गडचिरोलीत कोतवालाकडून चिमुकलीवर अतिप्रसंग

1260

– आरोपी अद्यापही मोकाट
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बुर्गी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येत असलेल्या एका गावामध्ये विवाहित पुरुषाने शेजारी राहत असलेल्या नात्यातीलच १ वर्ष ६ महिने वय असलेल्या चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक तेवढीच संतापजनक घटना शनिवारी उघडकीस आली आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर यातील आरोपी फरार असल्याची माहिती आहे. तर पीडितेची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूर येथे उपचाराकरिता रेफर केल्याची माहिती आहे.
या घटनेतील आरोपी हा ३० वर्षीय कोतवाल असल्याची माहिती असून त्याची पत्नी गरोदर असल्याने माहेरी गेल्याचे कळते. दरम्यान आरोपी हा शनिवारी दुपारच्या सुमारास पीडितेच्या घरी गेला. त्यावेळी मुलीचे आई वडील घरीच होते. आरोपीने मुलीला फिरवून आणतो व खाऊ घेऊन देतो या बहाण्याने तिला दुचाकीवर घेऊन गेला व अतिप्रसंग करून आई वडिलांच्या स्वाधीन केले. पण मुलीची अवस्था पाहून आईवडिलांना शंका आली असता त्यांनी एटापल्ली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. व मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला गडचिरोली येथे हलवण्यात आले असता पीडित मुलीला आंतरिक जखमा असल्याने पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
आरोपीविरुद्ध एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार असलेल्या आरोपीचा शोध घेणे सुरु असून दोन दिवस होऊनही अद्याप आरोपी मोकाट आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here