श्री मुर्लीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर येथे उत्सव सप्ताह साजरा

234

The गडविश्व
सावली : तालुक्यातील श्री मुर्लीधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर (हरणघाट) नावाजलेले असल्यामुळे या मंदिरात भक्त गणांची खूप मोठया प्रमाणात गर्दी तयार होते. कोरोना काळ सोडला तर दरवर्षी राम नवमी आणि हनुमान जयंती निमित्त श्री मुर्लीधर स्वामी महाराज हरणघाटयांच्या कृपा आशीर्वादाने आणि प्रभू श्री हनुमान जी च्या कृपेने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येते.
दरवर्षी प्रमाणे यंदाही रामनवमी आणि हनुमान जयंती निमित्त १० ते१६ एप्रिल असे सात दिवसांपर्यंत उत्सव सप्ताह पार पाडण्यात आले.
या सात दिवसीय सप्ताह मध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पहिल्या दिवशी घट स्थापना श्री मुर्लीधर स्वामी कार्तिक महाराज यांचे आई -वडीला च्या उपस्थित, कलश यात्रा, राम दरबार अभिषेक पूजन, श्री राम आणि सीता मया विवाह सोहळा, भोजन, शोभ यात्रा, महाप्रसाद , किर्तन आणि रात्रौ गुरुदेव सेवा मंडळ चांदापूर येथील भजन करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी तुलशी रामकथेवर विश्लेषण मानकर गुरुजी हिंघणघाट यांनी केले. भक्तिमय वातावरणात आशा प्रकारे सात आटोपला. या कार्यक्रमाला भक्त गणांच्या हजेरीने श्री मुर्लीधर धाम मंदिर गजबजून गेले.
या कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी, पारडीचे सरपंच बंडू मेश्राम, पारडीचे उपसरपंच पारस नागापुरे , ग्रामपंचायत सदस्यगण, गावातील नागरिक तसेच पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुर्कुडेश्वर देवटोक येथील कमिटी,
या कार्यक्रमाला देवस्थान कार्यकारी मंडळचे अध्यक्ष श्री संत मुर्लीधर महाराज, उपाध्यक्ष लछय्याजी गदेवार , सचिव सुभाष नागुलवार, सह सचिव नरेंद्र जककुलवार , कोषाध्यक्ष मुकेश गुरुनूलेआणि देवस्थान समितीचे सदस्यगण उपस्थित होते.
श्री हनुमान जयंतीच्या दिवशी समारोपी य कार्यक्रम घेऊन महाप्रसाद आणि भोजन दान सर्व भाविक भक्तांना देण्यात आले तसेच गरीब व गरजू महिलाना वस्त्र दान , सायकल चे वाटप श्री मुर्लीधर महाराज हरणघाट यांचे हस्ते करण्यात आले व शेवटी कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here