Thee गडविश्व
गडचिरोली : श्रीमती प्रतिभा प्रभाकर चौधरी मौजा नवेगाव ता.जि. गडचिरोली येथील प्रगतशील महिला शेतकरी आहेत. शेती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याने त्यांना महाराष्ट्र शासनातर्फ सन २०१९ चा जिजामाता कृषि भुषण पुरस्कार जाहिर झाला होता. नुकताच नाशिक येथे पार पडलेल्या शेतकरी पुरस्कार वितरण सोहळयात त्यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते प्रशस्तिपत्र, सन्मान चिन्ह व ५० हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजित पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे इ. उपस्थित होते.
गडचिरोली या मागास जिल्ह्यातुन महिला शेतकऱ्यास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषि अधिकारी प्रदिप वाहाने, मंडळ कृषि अधिकारी कु. नेहा पवार यांनी त्यांचे कौतुक केले. असे तालुका कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
