शैलेश पटवर्धन व नवनिर्वाचित नगरसेविका ज्योती सडमेक यांचा आविस मध्ये जाहीर प्रवेश

1085

– राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला केला राम राम
The गडविश्व
अहेरी : माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे खडे समर्थक शैलेश पटवर्धन व नवनिर्वाचित नगरसेविका ज्योती सड़मेक यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला राम राम करत आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आदिवासी विद्यार्थी संघामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम व जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
शैलेश पटवर्धन हे राष्ट्रवादी पक्षातून नगरसेवक म्हणून दोनदा निवडून आले असताना त्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे त्यांनी आविस मध्ये प्रवेश केला. अहेरीत त्याचे अनेक समर्थक आहेत, यांच्या प्रवेशामुळे अहेरी राजनगरीत राजेशाहीला मोठा धक्का बसणार आहे. त्यांनी आविस मध्ये प्रवेश करत आज अहेरी नगर पंचायतच्या उपाध्यक्षपदी विराजमान झाले आहे.
सदर प्रवेश कार्यक्रम जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आला. यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीताताई कुसनाके, शिवसेनाचे जिल्हा प्रमुख रियाज शेख, पं.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम, नवनिर्वाचित नगरसेवक,विलास गलबले, महेश बाकेवार, रोजा करपेत, मीना ओंडरे, सुरेखा गोडसेलवार, विलास सिडाम, इंदारामचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम, राकेश सडमेक, प्रशांत गोडशेलवार, कार्तिक तोगम, शिवराम पूल्लूरी, मिथुन देवगडे, प्रकाश दुर्गे, आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here