शेतकऱ्यांनी धान रोवणी दरम्यान तयार केला ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो’

116

The गडविश्व
गडचिरोली,१८ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्वव साजरा करण्यात आला. या अंतर्गत ‘हर तिरंगा मोहीम’ ही राबविण्यात आली. नागरिकांनीही याला उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला. गडचिरोली जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्याने थेट शेतात धान रोवणी दरम्यान ‘स्वातंत्र्याचा अमृत’ महोत्सव लोगो तयार करून नागरिकांचे मन जिंकले.
भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव गडचिरोली जिंल्हयातील दुर्गम, अतिदुर्गम भागातही उत्साहात साजर करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले. थेट शेतातही हा उत्सव साजरा करतांनाचे दृष्य हे आनंददायी होते. शेतकऱ्याने आपल्या शेतात स्वातंत्र्यांचा अमृत महोत्वव साजरा करतांना रोवणी दरम्यान ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो’ तयार करून अनेकांची मने जिंकली आहे. शेतातील बांध्या पर्यंत हा अमृत महोत्वस साजरा होणे ही अभिमानाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here