शेतकऱ्यांच्या रोवणीकरिता आसोला मेंढा तलावाचे पाणी लवकरात लवकर सोडा

461

– भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांची लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याकडे मागणी
The गडविश्व
सावली, ३ ऑगस्ट : पाण्या अभावी सावली व मूल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे रोवणी साठी शेतात पाणी नसल्याने शेतकरी चिंतातुर झालेला असून आसोलामेंढा प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या रोवणीकरिता, बाशी करीता, लवकर सोडावे अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या कडे केली आहे.
तालुक्यामध्ये शेतकरीवर्ग रोवण्याच्या कामात जोराने सुरुवात केलेले आहे परंतु चार, पाच दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतीच्या बांधावर रोवण्याकरिता पाणी नाही.त्यामुळे परे सुद्धा सुकून जात आहे.तसेच या वर्षी मोठ्या प्रमाणात आवत्या टाकल्याने बाशी मारण्यासाठी पाणी ची नितांत गरज असताना सर्वत्र शेतात पाणी आवश्यक आहे.
सावली ,मूल, पोंभुरणा या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायी असलेला गोसेखुर्द चा आसोला मेंढा जलसिंचन प्रकल्प या वर्षी तुडुंब भरून ओव्हर पल्लो वाहत आहे.त्यामूळे आसोला मेंढा चे काम हे बऱ्या पैकी झालेले असून तलावाचे पाणी हे सोडल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो त्या मुळे पाण्या अभावी हाती आलेले पिके जाण्यापेक्षा आसोला मेंढा तलावाचा पाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावे अशी कळकळीची विनंती नगरसेवक तथा भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांनी केली आहे .
या संदर्भात त्यांनी या क्षेत्राचे खासदार अशोक नेते,माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संपर्क साधून माहिती दिली त्यांनी लवकर निर्देश देत असल्याचे सांगितले आहे.

पाणी वापर संस्थांची मागणी

पाणी नसल्याने शेतकरी चिंतातुर झालेला असून पाण्या अभावी रोवणी खोळंबली असल्याने आसोला मेंढा तलावाचे पाणी शेतकऱ्यांना देण्याची मागणी चे पाणी वापर संस्था यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here