– पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने ग्रेनेड केला निकामी
The गडविश्व
पुणे, २६ जुलै : येथील हवेली तालुक्यामध्ये एका स्मशानभूमीजवळ एक ग्रेनेड आढळून आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने धाव घेऊन ग्रेनेड निकामी केला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील एका स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला आहे. तर या परिसरात असलेल्या आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजुला हि बॉम्ब सदृश वस्तु आढळून आली आहे. सदर बाब परिसरात राहणाऱ्या एका नागरिकांच्या निदर्शनास असता त्यांनी तातडीने पोलीस पाटील अंकुश उंद्रे आणि अशोक आव्हाळे यांना सांगितले. त्यानंतर पोलीस पाटील यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मांजरी खुर्द येथे पोलीस पथक आणि बॉम्ब शोधक पथक दाखल झाले. पथकाने पाहणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आढळून आलेला ग्रेनेड खूप वर्षांपूर्वीचा आहे. ७ ते ८ वर्षापूर्वी त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता. पावसामुळे तो आतावर आलेले दिसत आहे. बॉम्बशोधक पथकाने हा ग्रेनेड निकामी केला आहे. हा ग्रेनेड या भरावामध्ये कुठून आणि कसा आला याचा तपास पोलीस करत आहे.
