व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मेंबरने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास अ‍ॅडमिन जबाबदार नाही : केरळ हायकोर्ट

287

The गडविश्व
तिरुअनंतपुरम : व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून अनेकजण जुळले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप हा लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप आहे. अनेकजण व्हॉट्सअ‍ॅपचा व्यक्तिगत मेसेजसोबतच ग्रुपवर चर्चा करण्यासाठीही वापर करतात. मात्र, अनेकदा ग्रुपवरील मेसेजवरून वाद होतात. यानंतर या मेसेजसाठी ग्रुप अ‍ॅडमिनला जबाबदार धरले जाते. पोलिसांकडूनही अनेकदा ग्रुप अ‍ॅडमिन जबाबदार असेल अशाप्रकारच्या सूचना दिल्या जातात. मात्र, केरळ हायकोर्टाने या प्रकरणात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय देत म्हटले आहे कि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये इतर सदस्यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याला अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला.
न्यायालयाने म्हटले, “कोणत्याही मेसेजिंग सर्व्हिसवर ग्रुपमधील इतर सदस्यांनी केलेल्या पोस्टसाठी अ‍ॅडमीनला जबाबदार धरले जाईल अशी तरतूद असलेला कोणताही कायदा अस्तित्वात नाही. माहिती आणि प्रसारण कायद्यानुसार अ‍ॅडमीन हा मध्यस्थ नाही.”
“अ‍ॅडमीनकडे मेसेज पुढे पाठवण्यासाठी येत नाही किंवा तो पाठवत नाही. ग्रुपचे सदस्य आणि अ‍ॅडमीन यांच्यात तसा संबंध नाही. त्यामुळे ग्रुपमधील इतर सदस्यांच्या मेसेजसाठी अ‍ॅडमीनला जबाबदार धरणे गुन्हेगारी कायद्याच्या मुलभूत सिद्धांताच्या विरोधात आहे,” असेही न्यायालयाने निकालात नमूद केले.
केरळ उच्च न्यायालयाने यावेळी मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्वाड्याचाही संदर्भ दिला. तसेच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीनला इतर सदस्यांपेक्षा वेगळा अधिकार म्हणून केवळ सदस्यांना अ‍ॅड करणे किंवा रिमुव्ह करणे इतकाच अधिकार आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीनकडे ग्रुपमधील सदस्यांनी काय पोस्ट करावे याचे कोणते ही नियंत्रण नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here