व्यापारीवर्गानी अभय योजना-२०२२ चा ३१ मे पुर्वी लाभ द्यावा

78

– गडचिरोली चे व्यवसाय कर अधिकारी विनोद कुकडे यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली : वस्तु व सेवाकर विभाग,महाराष्ट्र शासन विभागान्वये, अभय योजना -2022 सुरु केलेली आहे. सदर योजने अतंगर्त 31 मार्च 2022 पर्यंत प्रलंबीत असलेले व्यवसाय कराचा ई-विविरण (E-Return) विना कर, व्याज व विना शास्ती दाखल करता येणार आहे. अभय योजना -2022 चा लाभ घेण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 ही असून त्यापूर्वी व्यपारीवर्गाणी सदर अभय योजना-2022 चा लाभ घ्यावा. असे आवाहन वस्तु व सेवा कर कार्यालय गडचिरोली चे व्यवसाय कर अधिकारी विनोद कुकडे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी www.mahagst.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे सुद्धा सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here