व्यसनातून मुक्त होण्यासाठी ३७ जणांचा पुढाकार

114

-पाथरगोटा, ढवळी, सूर्यपल्ली येथे क्लिनिक

The गडविश्व
गडचिरोली, २४ जुलै : ग्रामीण भागातील रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी आयोजित गाव पातळी शिबिराच्या माध्यमातून विविध गावातील ३७ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे आयोजित गाव पातळी व्यसन उपचार शिबिरात १२ नवीन व २ जूने अशा एकूण १४ रुग्णांनी नोंदणी करून पूर्ण उपचार घेतला. यावेळी प्राजू गायकवाड यांनी समुपदेशन केले तर रुग्णांची केस हिस्ट्री प्रभाकर केळझरकर यांनी घेतली. शिबिराला भेट दिलेल्या रुग्णांची नोंदणी मुक्तिपथ तालुका संघटक भारती उपाध्ये व अनूप नंदगिरवार यांनी केली. यशस्वीतेसाठी पोलिस पाटील राऊत व गावातील नागरिकांनी सहकार्य केले. धानोरा तालुक्यातील ढवळी येथील शिबिराचा एकूण ११ रुग्णांनी लाभ घेतला. शिबिराचे नियोजन तालुका प्रेरक भाष्कर कडयामी यांनी केले. यशस्वीतेसाठी गाव पाटील शिवराम तुलावी, गाव पुजारी तथा ग्रामसभा अध्यक्ष परसराम कोवाची, विनोद कोवाची, देवराव तुलावी यांनी सहकार्य केले.
अहेरी तालुक्यातील सूर्यपल्ली येथे गाव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १३ रुग्णांनी नोंदणी केली तर १२ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. यावेळी साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. दारूची सवय कशी लागते. धोक्याचे घटक कोणते आदींची माहिती दिली. तसेच पूजा येल्लुरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम रुग्णांना समजावून सांगितले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी गावातील पेसा अध्यक्ष करण आलाम, शिक्षक आलाम, सरपंच नागेश कन्नाके आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here