वैरागड येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

221

– २५ रुग्णांनी घेतला उपचार
The गडविश्व
गडचिरोली :आरमोरी तालुक्यातील महत्वाचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या वैरागड येथे मुक्तिपथ अभियानातर्फे व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावातील एकूण २५ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. यावेळी रुग्णांना समुपदेशन सुद्धा करण्यात आले.
गावातील व्यसनी रुग्णांना गावातच वेळेवर उपचार मिळावा, यासाठी ग्रामपंचायतच्या सहकार्याने व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात गावातील एकूण २५ रुग्णांनी पूर्ण उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, रुग्णांना प्राजु गायकवाड यांनी समुपदेशन केले. रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात, धोक्याचे घटक, नियमित उपचार घेणे आदींबद्दल माहिती दिली. संयोजक प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेतली. तसेच व्यसन उपचार घेण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांनी आरमोरी येथील तालुका क्लिनिकला भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले.
यावेळी ग्रापं सरपंच संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, ग्रामपंचायत सदस्य आदेश आकरे, छाणू मानकर, प्रतिभा बनकर, गौरी सोमणानी, ग्राम विकास अधिकारी प्रभाकर बोदेले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here