वैद्यकीय क्षेत्राला मोठे यश : एड्स आजारावर सापडले औषध

305

The गडविश्व
नवी दिल्ली : वैद्यकीय क्षेत्राला मोठे यश आले आहे. एचआय़व्ही एडस आजारावर औषध सापडले आहे. पहिल्यांदाच एक महिला एडसमधून ठणठणीत बरी झाली आहे.
अमेरिकेतल्या डॉक्टरांनी आणि संशोधकांनी एड्सवरचे औषध शोधले आहे. स्टेमसेल ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून एड्सबाधित महिलेवर उपचार करण्यात आले. ज्या व्यक्तीमध्ये HIV विरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती होती, अशा व्यक्तीने या स्टेमसेल्स दान केल्या. या ट्रान्सप्लांटमध्ये अंबिलिकल कॉर्डमधल्या रक्ताचा वापर करण्यात आला.
२०१३ मध्ये या महिलेला एड्स झाला त्यानंतर चार वर्षांनी तिला ल्यूकेमिया झाला. २०१७ मध्ये महिलेवर ट्रान्सप्लांटचे उपचार सुरू झाले. ट्रान्सप्लांटनंतर आता ही महिला ठणठणीत बरी झाली आहे. तिच्यावरचे एड्सचे सगळे उपचार आता थांबवण्यात आले आहेत.
याआधी जगात एड्समधून बरे झालेले फक्त दोन रुग्ण आहेत. त्या दोघांना विविध औषधांच्या माध्यमातून बरे करण्यात आले आहे. अमेरिकेतली ही महिला एडस, ल्युकेमियामधून ठणठणीत बरी झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या या संशोधनामुळे जिंदगी मिलेगी दोबारावरचा विश्वास आणखी वाढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here