विविध योजनांविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन

206

The गडविश्व
गडचिरोली, २९ सप्टेंबर : स्थानिक गोकुळनगर येथील अंगणवाडी केंद्रात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडानिमित्त समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त यांच्या आदेशान्वये फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस के.खंगार यांच्या निर्देशांन्वये विविध योजनांविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुन्नी खोब्रागडे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. एकता कुमरे, प्रा.दिपक तायडे उपस्थित होते. यावेळी समाजातील निराधार,बेघर, दिव्यांग, अनुसूचित जाती नव बौध्द घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना रमाई घरकुल आवस योजना, संजय गांधी निराधार योजना, गटई कामगार योजना, दिव्यांगासाठी योजना, पोषण आहार आदी योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बीएसडब्ल्यू भाग दोन च्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here