विदर्भासह राज्यभरात पुन्हा उष्णतेच्या लाटा : हवामान खात्याचा इशारा

470

– हलक्या पावसाचीही शक्यता
The गडविश्व
मुंबई  : विदर्भासह राज्यभरात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात तापमान आणखी वाढणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर हलक्या पावसाची (Rain) शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
राज्यभरात तापमानवाढीचा अंदाज आहे. विदर्भात 18 ते 20 एप्रिलदरम्यान, उष्णेची लाट येणार आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्रात 19 एप्रिलनंतर पावसाची शक्यता आहे. शनिवारी चंद्रपुरात राज्यातले सर्वाधिक म्हणजेच 44 अंश तापमान होते. तर त्याच काळात म्हणजे 19 एप्रिलनंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वर्धा, अकोला, नागपूरमधलं तापमान 42 ते 43 अंशांवर आहे. मराठवाड्यात 42अंश, तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सोलापुरात ते 40 ते 41 अंशांवर आहे.
दरम्यान, वायव्य भारतात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. तेथे तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याने विदर्भात 18 ते 20 एप्रिल या कालावधीत काही ठिकाणी पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातही कमाल तापमानाचा पारा सध्याच्या तुलनेत काहीसा वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच दक्षिण आणि पूर्वोत्तर भागांत पावसाळी वातावरण दिसून येत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही भागांत 19 एप्रिलनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे. तर राजस्थानसह, पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या विभागातही तापमान वाढणार आहे. या भागातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गुजरात, मध्य प्रदेशानंतर विदर्भातही 18 एप्रिलनंतर उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here