– परिसरात भितीचे वातावरण,
The गडविश्व
चंद्रपूर : जिल्हयातील सिंदेवाही तालुक्यातील चिकमारा येथील महिलेला वाघाने घरात प्रवेश करून ठार केल्याची घटना गुरूवार २८ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. तुळसाबाई परसराम पेंदाम (८९) रा. चिकमारा ता.सिंदेवाही जि. चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार , तुळसाबाई पेंदाम हया घरात झोपल्या असतांना रात्रो १२. ३० वाजताच्या सुमारास वाघाने घरात प्रवेश करून तुळसाबाई यांच्यावर हल्ला केला यात त्या ठार झाल्या. घटनेची माहिती पोलीस स्टेशन सिंदेवाही यांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होवून पंचनाम करून पुढील तपास करित आहे. सदर घटनेमुळे परिसारात भितीचे वातावरण पसरले आहे.