The गडविश्व
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथे मुक्तिपथ ग्रापं समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ग्रापं समिती पुनर्गठित करून अवैध दारू व तंबाखूविक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी चर्चा करण्यात आली.
यावेळी मुक्तिपथ अभियान गावस्तरीय रचनेची माहिती देण्यात आली. मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती पुनर्गठित करण्यात आली. या समितीच्या अध्यक्ष,सचिव व सदस्यांची निवड करण्यात आली. ग्रापं समितीद्वारे मुक्तिपथ गाव संघटनेला मान्यता देण्यात आली. गावातील अवैध दारू व तंबाखूविक्री कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर चर्चा करण्यात आली. ग्रापं अधिनियम नुसार गावात दारू व तंबाखू विक्री केल्यास दंडात्मक कार्यवाही केल्या जाईल. ग्रापं समितीची दर महिन्याला आढावा बैठक घेऊन नियोजन करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
यावेळी सरपंच पुष्पा आत्राम, ग्रामसेवक बांबोळे, पोलिस पाटील विजय पिपरे, सुभाष सेडमेक, गणेश चापले, शिक्षक एस.एस. उलीलवार, एस.एस. बांबोळे, रमेश गांधारे, वासुदेव दुर्गे, ग्रापं शिपाई सडमेक, अंगणवाडी सेविका निकिता मडावी, आशा स्वयंसेविका माया मडावी, तालुका संघटक केशव चव्हाण, तालुका प्रेरक आनंदराव कुमरी उपस्थित होते.