लोकमान्य गणेश मंडळ गडचिरोलीच्या वतीने भव्य रक्तदान व कोविड लसीकरण शिबिर

312

– २२ रक्तदात्यांनी पुढाकार घेत केले रक्तदान तर १६ जणांनी घेतली कोविड लस
The गडविश्व
गडचिरोली, १० सप्टेंबर : शहरातील आरमोरी मार्गावरील लोकमान्य गणेश (lokmanya ganesh mandal gadchiroli) मंडळातर्फे ७ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान व कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पहावयास मिळाला.
लोकमान्य गणेश मंडळ हे पुरस्कृत गणेश मंडळ आहे. दरवर्षी या मंडळातर्फे विविध उपक्रम राबविल्या जाते त्याचीच दखल घेत या मंडळाला विविध पुरस्कार प्राप्त झाले आहे. यंदाही मंडळातर्फे सुसज्ज ठिकाणी गणपतीची स्थापना करण्यात आली होती तसेच दरवर्षी प्रमाणे विविध उपक्रम राबविण्यात आले. गडचिरोली रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा बघता रक्तदान शिबिर (blood donet camp) व देशभरात पसरलेल्या कोरोना सारख्या आजारावर उपाय म्हणून कोविड लसीकरण (covid vaccin) शिबिराचे आयोजन लोकमान्य गणेश मंडळातर्फे करण्यात आले होते. यावेळी २२ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले तर १६ जणांनी कोविड लस घेतली. यावेळी लोकमान्य गणेश मंडळातर्फे राबवित असलेल्या उपक्रमाबाबत नागरिकांनी स्तुती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here