लाचखोर तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात

921

– २५ हजारांची स्वीकारली लाच

The गडविश्व
चंद्रपूर,२१ जुलै : रेती पुरवठा व्यावसायिकाकडून ७० हजार रूपयांची मागणी करून त्यातील उर्वरित २५ रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना तलाठी विनोद गेडाम (४५) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे..
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांचा रेती पुरवठा करण्याचा व्यावसाय आहे. ८ फेब्रुवारी २०२१ रोजी सदर व्यावसायिकाचा रेतीचा ट्रक तलाठी विनोद गेडाम यांनी पकडून ७० हजार रूपयांची मागणी केली होती. त्यापैकी व्यवसायिकाकडून ३५ हजार रुपये घेऊन ट्रक सोडून देण्यात आलेला होता. व उर्वरित रक्कम त्यानंतर देण्याचे ठरले होते. परत सदर तलाठ्याने रेती पुरवठा व्यावसायिकाकडे २५ हजारांची मागणी केली होती. मात्र रेती पुरवठा व्यावसायिकास सदर रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा करून सखोल चौकशी केली व चौकशीअंती सापळा रचला. दरम्यान मंगळवार १९ जुलै रोजी तलाठी गेडाम याला विरूर येथे २५ हजार रूपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक करण्यात आली.
सदर कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक अविनाश भामरे, नरेश नन्नावरे, रोशन चांदेकर, रविढें, संदेश वाघमारे, मेघा मोहूर्ले, सतिश सिडाम यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here