– लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीने सत्कार
The गडविश्व
गडचिरोली : लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी येथील विद्यार्थी विपुल बांबोळे याची औरंगाबाद कारागृह शिपाई पदी निवड झाली. त्याप्रित्यर्थ विपुल बांबोळे चा आज अकॅडमीचे संचालक प्रा. राजीव खोबरे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विपुल बांबोळे या विद्यार्थ्याने घरची हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा त्यावर मात करून हे यश मिळवले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी केवळ जिल्हा पोलीस भरती वरती लक्ष केंद्रित करून अभ्यास करीत असताना व शारीरिक चाचणी आधी कि लेखी परीक्षा आधी याचा विचार करत असताना विपुल बांबोळे या विद्यार्थ्यांने यासर्व गोष्टीला बाजूला सारून आज औरंगाबाद येथे कारागृह शिपाई पदाची केवळ ७६ जागेची जाहिरात असताना त्याने लेखी परीक्षेत १०० पैकी ९७ गुण व शारीरिक चाचणीत ५० पैकी ४४ असे एकूण १४१ गुण मिळवून गुणवत्ता यादीत खुल्या प्रवर्गात १० वा क्रमांक मिळवला त्याचे हे यश खरंच वाखण्यासारखे आहे. विपुल बांबळे या विद्यार्थ्यांने अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रामाणिक अभ्यास करून व अभ्यासात सातत्य ठेवून कुठल्याही परीक्षेत यश मिळवू शकतो तसेच पुढे त्यांनी भावी अधिकारी होण्याचे स्वप्न आहे असे सांगितले. त्याने आपल्या यशाचे श्रेय आपले आई- वडिल तसेच काका व मावशी व शिक्षकांना तसेच मित्रांना दिले. या सत्काराला अकॅडमीचे संचालक प्राध्यापक नंदनवार तसेच प्राध्यापक रणजीत व अकॅडमीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. त्याच्या या निवडीने त्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)