लँडिंग होताना हेलिकॉप्टरचा अपघात : दोन पायलटचा मृत्यू

1120

– मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख
The गडविश्व
रायपूर : येथील विमानतळावर हेलिकॉप्टर लँडिंग होतांना क्रॅश होऊन अपघात झाल्याची घटना गुरुवारी रात्रो ९ वाजताच्या सुमारास रायपूर एअरपोर्टवर घडली. या अपघातात दोन पायलटचा मृत्यू झाला आहे. या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. कॅप्टन गोपाल कृष्ण पांडा, कॅप्टन एपी श्रीवास्तव असे अपघातात मृत्यू झालेल्या पायलटचे नाव आहे.

 

राज्य सरकारचे एक हेलिकॉप्टर  गुरुवारी रात्रो 9 वाजताच्या सुमारास लँडिंग होताना क्रॅश झाले. दरम्यान हेलिकॉप्टर मध्ये असलेले दोन पायलटचा या अपघातात मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर नेहमीच्या प्रशिक्षणाच्या उड्डाणावर होते त्यानंतर ते क्रॅश झाले, तर तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातातबाबत अधिक तपास डिजीसीए आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार सविस्तर केला जाणार आहे. मृतक पायलटच्या कुटुंबियांना तातडीने मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here