The गडविश्व
ता. प्र / धानोरा : गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथे शिक्षण घेत असलेल्या रोहन दिवाकर भोयर याने दहावीच्यापरीक्षेत ५०० पैकी ४५७ गुण (९१.४० % ) गुण घेऊन यश संपादन केले.
नुकताच बोर्डाने इयत्ता दहावीचा निकाल घोषित केला त्यात धानोरा तालुक्यातील रांगी येथील दिवाकर भोयर यांच्या मुलाने कठिण परिश्रम घेत
घवघवीत यश संपादन केले. त्याने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व आई वडील यांना दिले.
विद्यार्थ्याच्या यशाबद्दल भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराव बाबा आत्राम, अध्यक्षा भाग्यश्री आत्राम (हलगेकर ), मार्गदर्शक ऋतूराजजी हलगेकर, विद्यालयाचे प्राचार्य संजय गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.