The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील रेगडी येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील क्रीडा शिक्षक संतोष गैनवार यांची नुकतीच राज्य स्तरावर पंच अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
२२ ते २८ जुन दरम्यान कणकवली (सिंधुदुर्ग) येथे सुरु होणाऱ्या १८ व्या युथ मुली व ८० व्या युथ मुलांच्या राज्य स्तरीय अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेकरिता क्रीडा शिक्षक संतोष गैनवार यांची पंच अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आय. एम. दोनाळकर, वरिष्ठ शिक्षक मैंद, केवे तसेच शाळेचे अधीक्षक बुकने तसेच गडचिरोली बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जगदीश मस्के, सचिव यशवंत कुरुडकर, बॉक्सिंग प्रशिक्षक महेश निलेकार, पंकज मडावी, निखिल इंगडे आदिनी अभिनंदन केले आहे.