राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते मधुकर गोंगले यांचा आविस पक्षात जाहीर प्रवेश

261

– राजाराम येथे प्रवेश कार्यक्रम संपन्न
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील राजाराम खां.येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर कार्यकर्ते मधुकर गोंगले, रमेश पोरतेट, विजय आत्राम यांनी आविस चे विदर्भ नेते दीपक आत्राम व जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आदिवासी विद्यार्थी संघटनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांचा जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती अहेरी सभापती भास्कर तलांडी, जि.प.सदस्य अजय नैताम, सरपंच नागेश कनाके, उपसरपंच सुरक्षा आकदर, सदस्य नारायण कंबगोनिवार, सपना तलांडी, प्रिया पोरतेट, ऍड.हनमंतु आकदर, माजी सरपंच ज्योती जुमनाके, माजी उपसरपंच संजय पोरतेट, सुरेश पेंदाम, माजी सरपंच शंकूतला कुलमेथ आदी आविस चे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here