रानडुकराच्या हल्ल्यात महिला ठार

780

The गडविश्व
अहेरी : तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर डुकराने हल्ला केल्याने महिला ठार झाल्याची घटना शुक्रवार २० मे रोजी घडली. सपना पोचन्ना जिणका (३६) रा. कम्मापूर ता. अहेरी जि . गडचिरोली असे सदर हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त महितीनुसर सपना ही नेमहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास जंगलात तेंदूपत्ता तोंडण्याकरिता गेली होती. दरम्यान अचानक रानडुकराने तिच्यावर हल्ला केला यात ती गंभीर जखमी झाली. मात्र उपचार मिळण्याआधीच तिचा मृत्यू झाला. सदर घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून तेंदूपत्ता तोडणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here