द गडविश्व
वृत्तसंस्था /जालना : राज्यात 800 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली तरच लॉकडाऊन केला जाईल अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती, आता मात्र ओमायक्रॉनचा प्रसार असाच वाढत राहिला तर हीच मर्यादा 800 मेट्रिक टन वरुन 500 मेट्रिक टन वर आणावी लागेल आणि त्यानंतरच लॉकडाऊन केला जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
नागरिकांनी निर्बंधाचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान यापूर्वी 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागला तर लॉकडाऊन आम्ही ठरवले होते. पण राज्यातील ओमायक्रॉनची स्थिती पाहता ही मर्यादा 500 टनावर आणावी लागेल. दरम्यान सध्या निर्बंध लावण्याचा आमचा हेतू नाही मात्र काळजीपोटी हे प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतील असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
