राज्यातील शिक्षकांच्या बदल्या यापुढे ऑनलाईन पद्धतीनेच होणार

475

The गडविश्व
मुंबई : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या आता पुन्हा ऑनलाईन केल्या जाणार आहेत. कोरोना काळात शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन झाल्या नव्हत्या. आता येत्या काळात पुन्हा ऑनलाईन जिल्हा परिषद शिक्षक बदल्या होतील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे . २७ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. कोरोनामुळे शिक्षकांचा बदल्या रखडल्या होत्या. शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पुन्हा मार्चपासून राबविण्यात येणार असल्याचे याआधी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले होते. सॉफ्टवेअर टेंडरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. टेंडरिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन मार्चमध्ये बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊन मे महिन्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने बदल्या होतील, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली होती. त्यामुळे आता बदल्या कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदलीच नवीन धोरण राज्य सरकारने मागच्या वर्षी ठरवण्यात आले होते. त्या अनुषंगाने एक नवीन अद्ययावत सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी एका कंपनीची नेमणूक करण्यात अली होती.आणि त्या बरोबर एक समितीची नेमणूक देखील करण्यात आली होती. या वर्षी त्या सॉफ्टवेअर अपडेटचे काम सुरू असून त्याच्यामध्ये शिक्षकांची माहिती येणार आहे आणि ती पारदर्शक असून या सॉफ्टवेअरच्या आधारे यापुढे राज्यातील शिक्षकांची बदली ही ऑनलाईनच्या माध्यमातून होणार आहे. अशी माहिती या समितीचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद येथे शिक्षकांच्यासाठी सॉफ्टवेअर अपडेट आणि यात काय माहिती असावी कसा याचा वापर व्हावा यासाठी समितीच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here