राज्यातील प्रशासकीय बदल्यांना ब्रेक : ३० जून पर्यंत बदल्या न करण्याचे राज्यसरकारचे आदेश

588

The गडविश्व
मुंबई: राज्य सरकारने प्रशासकीय बदल्यांबाबत काल २७ मे रोजी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील कोणतीही प्रशासकीय बदली ३० जून पर्यंत करता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे. तसे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने जारी करण्यात आले आहे. यामुळे आता प्रशासकीय बदल्यांना ब्रेक लागणार आहे.
शासन निर्णयात ‘ महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनीयमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार करण्यात येणाऱ्या बदल्या सन २०२२ -२३ या चालु आर्थिक वर्षी ३० जून २०२२ पर्यंत करण्यात येऊ नये. तथापि प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास अशी बदली मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने करण्यात यावी’ असे म्हटले आहे.
विशेष म्हणजे राज्य सरकारने मे महिन्यात बदल्यसा करा असा आदेश दिल होता. परंतु आता राज्य सरकाने थेट ३० जून पर्यंत बदल्या न करण्याचे आदेश दिले आहे. या निर्णयामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत असून या निर्णयमागे राजकीय कारण असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here