राज्यातील नगर परिषद निवडणुकांचा बिगूल वाजला

302

– निवडणूक आयोगाव्दारे प्रभागर रचना कार्यक्रम जाहिर

The गडविश्व
गडचिरोली : राज्यातील एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व मुदत संपत असलेल्या वर्ग अ,ब व क या तिन्ही वर्गातील २०८ नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या प्रभाग रचना कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. याबाबतचे आदेश काल २२ जानेवारी रोजी राज्या निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना परित केले आहे.
नगरपरिषदांच्या निवडणूकांकरिता प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर दोन परिषद सदस्यख् पंरतु तिनपेक्षा अधिक नाहीत इतके सदस्य निवडून देण्याची तरतूद केली आहे. नगरपरिषदेच्या निवडून द्यावयाच्या किमान व कमाल सदस्यांची संख्या सुधारित करण्यात आली आहे. नगारिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशनन लिव्ह टू अपीलनुसार राज्याने नागरिकांच्या मागासप्रवर्ग प्रवर्गाबाबत असलेली आकडेवारी संबंधित मागासवर्ग आयोगास द्यावी. मागासवर्ग आयोगाने सदर आकडेवारी तपासून त्यानुसार योग्य त्या शिफारसी राज्यास तसेच राज्य निवडणूक आयोगास काराव्यात असे आदेशित केले आहे. मात्र सदर शिफारसी प्राप्त होण्यास अथवा त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्यास काही लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकांचे कामकाज विहीत कालावधीत पुर्ण करण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रभागांच्या हद्ी निश्चित करण्याचा टप्पा तत्पुर्वी पुर्ण करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सोडतीची प्रक्रिया पुर्ण करण्यापुर्वी प्रथम निवडणुक प्रभागांच्या भौगोलिक सिमा प्रसिध्द करून त्यावरील हरकती व सूचना प्राप्त करून सुनावणीची प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक आहे.
गडचिरोली जिल्हयातील देसाईगंज आणि गडचिरोली या दोन नगरपरिषद लढविण्यासाठी इच्छुक जोमाने कामाला लागणार आहेत. नुकताच जिल्हातील 9 नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्यातच आता नगर परिषद निवडणुकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने विविध राजकीय प़क्ष व्यूहरचना आखण्यास सुरूवात करतील तर काहींनी आधीच व्यूहरचना आखली असल्याने लवकरच नगरपरिषदेचीही रणधुमाळी नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here