राज्यस्तरीय योजनेअंतर्गत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारीत योजनेची अंमलबजावणीसाठी अर्ज आंमत्रित

140

The गडविश्व
गडचिरोली : शासन निर्णय क्रं.पविआ-1018/ दिनांक 8 मार्च 2019 नमूद केल्याप्रमाणे राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुधारीत गोवर्धन गोवंश केंद्र या योजनेसाठी शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे गडचिरोली जिल्हयातील 05 महसूली उपविभागातून पात्र गोशाळांचे अर्ज मागविण्यात येत आहे.योजनेचा उद्देश,लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती,लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज अनुषंगीक कागदपत्रे इ.बाबीची सविस्तर माहिती www.ahd.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
इच्छुक पात्र गोशाळांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय गडचिरोली यांच्याकडे दिनांक 6 एप्रिल 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here