राजकीय वर्तुळात मोठा भूकंप : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

833

The गडविश्व
मुंबई : मागील आठ दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप घडला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्द्वारे जनतेशी संवादादरम्यान हा मोठा निर्णय घेतला.
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेने दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, “आज मला विशेषतः शरद पवार आणि सोनिय गांधी आणि सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहे. आज निर्णय घेतांना फक्त चार शिवसेनेचे मंत्री होते. बाकीचे तुम्ही जाणताच. या निर्णयाला कोणी विरोध केला नाही, सर्वांनी मान्यता दिली. ज्यांचा विरोध आहे हे भासवले जात होते त्यांनी पाठिंबा दिला,” असे म्हणत सहकारी पक्षांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here