रांगी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड

175

– वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ४ नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रथम दर्जाचा सागवन आहे. वन विभाग कायदेशीर कटाई करुण राज्याच्या व देशाच्या बाहेर विकतो. यातुन सरकारला महसुल प्राप्त होतो. अन्य झुडपी जंगल व इतर झाडे औषधी करिता वापर केल्या जाते. एवढी वनसंपदा असताना मात्र रांगी परिसरात जमिनीचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत असुन त्याकरिता अवैध वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. याकडे मात्र वन विभागाचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करित असल्याने वनस्पतींचा ऱ्हास होत आहे. यासाठी संबंधिततावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वनाच्छादित जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्हा ऐवढी वनसंपदा इतर ठिकाणी उपलब्ध नाही. उत्तर वनपरिक्षेत्रा अतंर्गत येत असलेल्या या भागात साग,येण, मोह, बेहळा, गर्राडी व इतर वृक्ष आहेत. संबंधित कर्मचारी रांगी येथे वास्तव्याने राहात नाहीत. त्यामुळेच येथील पाचही बिटात मोठ्या प्रमाणात अवैध अतिक्रमण व वृक्षतोड तसेच वृक्षाची तस्करी सुरु आहे. रांगी परिसरात सन २००५ नतंर मोठ्या प्रमाणात वनजमीनीवर अतिक्रमन असताना सुद्धा येथील वनविभाग कुंभकर्णाची झोप घेताना दिसतोय. अतिक्रमण धारकावर एफआयआर दाखल करण्याचे सक्त आदेश असतानाही येथे अजुन पर्यत कोणतीही कारवाही होतांना दिसत नाही त्यामुळे वन विभागाची मुक संमत्ती तर नाही ना ? असा प्रश्न ग्रामस्थ विचारीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here