रशियाने भारतासाठी सहा तास युद्ध थांबवल्याची माहिती चुकीची : परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

296

The गडविश्व
नवी दिल्ली : युक्रेनमधील खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीय भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवल्याची बातमी देशातील प्रमुख वाहिन्या आणि वृत्तपत्रात झळकली होती. यावर आता परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. यासंबंधी प्रसारित झालेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या संबंधी ज्या काही बातम्या प्रसारित झाल्या त्या चुकीच्या आहेत. केवळ रशियाच नव्हे तर युक्रेननेही भारतीय नागरिक सुरक्षितपणे बाहेर पडावेत, आजूबाजूच्या सीमांवर पोहोचावेत यासाठी प्रयत्न केले आहेत.
बुधवारी रात्री पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा युक्रेनच्या सैन्याकडून सुरक्षा ढालीसारखा वापर केला जात आहे असे पुतिन म्हणाले. पुतिन यांनी या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रशियाने सहा तास युद्धबंदीची घोषणा केली आहे. या दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशिया सैन्याकडून एक कॉरिडॉर करण्यात येणार असल्याचेही पुतिन यांनी सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here