The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या येरमनार येथे गोटुल समितीच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलिबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उदघाटन आज अहेरी पं . स. सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, दूसरा पुरस्कार पं.स.सभापती भास्कर तलांडे व सरपंच यांच्यत कडून तर तिसरा पुरस्कार जि.प.शाळेतील शिक्षकाकडून असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी येरमनारचे सरपंचा सौ.संध्या मडावी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पेरमिलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य प्रमोद आत्राम, उपसरपंच विजय आत्राम, ग्रा.पं .सदस्य इरपा गावडे, जाणोताई गाव पाटील डोलु मडावी, मुख्याध्यापक पठाण, सातपुते, मेश्राम आदि होते.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविक मडावी सर यांनी केले तर संचालन व आभार हंनमतु यांनी. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.