युक्रेनमध्ये अडकलेले गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांच्या नातेवाईकांना संपर्क कक्ष

262

– जवळच्या पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली : सद्यास्थितीत रशिया व युक्रेन या देशात तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली असून रशिया देशाने युद्ध घोषित केले आहे. या परिस्थितीत युक्रेनमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ सदर नागरिकांचे नातेवाईकांनी जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करुन कळवावे, जेणेकरुन अडकलेले नागरिकांना सुखरुपपणे परत सुरक्षित ठिकाणी आणण्याबाबत कार्यवाही करता येईल. याबाबत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, युक्रेनमध्ये अडकलेले त्यांचे नातेवाईकांबाबत तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय, गडचिरोली येथे 07132-223149, 07132-223142 किंवा मो.क्र. 9403801322 या क्रमांकावर संपर्क करुन कळवावे असे नि.उ.जि. तथा मु.का.अ. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here