‘या’ देशात मास्क आणि लसीकरणातून नागरिकांची सुटका

217

The गडविश्व
इटली : एकीकडे कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा जगभर थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे युरोपियन देशात कोरोना संदर्भात वेगळाच निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क तसे\च लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र या देशात मास्क आणि लसीकरणातूनच नागरिकांची सुटका केली आहे. युरोपमधील देशांमध्ये मास्क आणि लसींची आवश्यकता हटवण्यात येत आहे.स्पेन सरकारने कोरोनाला सामान्य फ्लू मानले आहे. यासोबतच लोकांना सोबत राहण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
केवळ मास्कच नाही, तर तिथली सरकार कोरोना लसीची आवश्यकता देखील हटवण्याची शक्यता आहे. सरकारचा विश्वास आहे की, कोरोनाचे केवळ ओमायक्रॉन व्हेरिएंट महामारीला शेवटच्या उंबरठ्यावर घेऊन जाईल आणि ही प्रक्रिया सुरू झाली आहे. यूकेचे शिक्षण सचिव म्हणाले की, यूके आता साथीच्या रोगापासून स्थानिक पातळीवर जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. यासोबतच मृतांचा आकडाही कमी नोंदवला जात आहे. अशा परिस्थितीत स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सांचेज यांनी साथीच्या काळात लादलेले निर्बंध संपवून सामान्य जीवनात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले की, आता ते महामारीच्या समाप्तीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात गुंतले आहेत. मात्र युरोपची सरकारे कदाचित वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर त्याचे तुलना करत आहेत. दुसरीकडे, आयर्लंडमध्ये वाढत्या कोरोना प्रकरणांना न जुमानता, एक स्वैच्छिक लसीकरण प्रणाली तयार केली जात आहे. सरकारला आता लसीकरणाच्या बाबतीत स्वतःहून निर्णय घेण्याचा अधिकार लोकांना द्यायचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here