‘या’ दिवसापासून घोडाझरी ओव्हरफ्लो स्थळावर राहणार प्रवेश बंदी

935

– कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता घेतला निर्णय

The गडविश्व
चंद्रपूर/नागभीड : नागभीड तालुक्यातील घोडाझरी ओव्हरफ्लो स्थळावरील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या परिस्थितीवर आळा घालण्यासाठी व गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी येत्या १५ ऑगस्ट ला व प्रत्येक रविवारी घोडाझरी ओव्हरफ्लो स्थळावर प्रवेश बदी राहणार आहे. मात्र घोडाझरी ओव्हरफ्लो स्थळावर प्रवेश बंदी असली तरी घोडझरी पर्यटक स्थळ मात्र सुरू राहणार आहे.
नागभीड तालुक्यात ब्रिटिश कालीन घोडाझरी येथे तलाव आहे. हे तलाव पर्यटकांसाठी आकर्षक ठरले असून यंदा पडलेल्या मुसळधार पावसाने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने ओव्हरफ्लो वाहत आहे. याठिकाणी हजारोंच्या संख्येन पर्यटक येत असतात. त्यामुळे अफाट गर्दी होत असते. या तलावात दोन दिवसांपुर्वी एका पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे घटनेची पुनरावृत्ती होवू नये व गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता पोलीस विभागाच्या सूचनेनुसार येत्या १५ ऑगस्ट व प्रत्येक रविवारला घोडाझरी ओव्हरफ्लो स्थळाकडे जणारा प्रवेश गेट बंद करून घोडाझरी ओव्हरफ्लो स्थळाकडे प्रवेश बंदी ठेवावी असे आदेश विभागाने जाहीर केले आहे.
घोडाझरी ओव्हरफ्लो स्थळाकडे प्रवेश बंदी असली तरी घोडाझरी पर्यटक स्थळ मात्र सुरू राहणार आहे. घोडाझरी पर्यटक स्थळावर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना घोडाझरी पर्यटक स्थळावरच जात असल्याची खात्री झाल्यावरच संबंधित पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे तर काहींनी घोडाझरी पर्यटक स्थळाचा बहाणा करून ओव्हरफ्लो स्थळावर प्रवेश करून पाण्यात उतरल्यास संबंधित विभाग कारवाई करणार आहे असे कळते.
त्यामुळे आता पर्यटकांनी हि सूचना लक्षात घेऊन व नियमांचे पालन करूनच घोडाझरी ओव्हरफ्लो, घोडाझरी पर्यटक स्थळ पाहण्याचा आनंद घ्यावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here