‘या’ ठिकाणी शिवसेनेला मोठे खिंडार ; शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सहभागी

247

The गडविश्व
मुंबई ७ जुलै : शिंदे गट आणि भाजपने बहुमत सिद्ध करून राज्यात सरकार स्थापन केले. मात्र, राज्यातील या सत्तातरानंतर उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाण्यात शिवसेनेला आता मोठे खिंडार पडलेलेआहे. ठाण्यातले शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे ठाणे महानगरपालिकेतील अर्धे नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत आहेत. ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. माजी महापौर नरेश मस्केंसमवेत ६६ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी आपले समर्थन शिंदे गटाला दिले. शिवसेनेचा एकही नगरसेवक आता ठाणे महानगरपालिकेत राहिलेला दिसत नाही. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांचा शब्द सर्वस्व मानला जातो. मुंबईप्रमाणेच ठाणे महानगरपालिकाही शिवसेनेसाठी तितकीच महत्त्वाची आहे. अशात शिवसेनेचे ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here