भूकंपाच्या धक्क्यांनी अफगाणिस्तान हादरला : २६ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

177

मदत आणि बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती

The गडविश्व
काबूल : अफगाणिस्तानच्या पश्चिमेला असलेल्या बदगिस प्रांतात काल सोमवारी दुपारच्या सुमारास भूकंपाच्या दोन धक्क्यांनी तुर्कमेनिस्तानला लागून असलेला सीमावर्ती भाग हादरला. यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. एका स्थानिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. भूकंपग्रस्त दुर्गम गावांमध्ये अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रांताच्या संस्कृती आणि माहिती विभागाचे प्रमुख बास मोहम्मद सरवरी यांनी सांगितले की, भूकंपामुळे अनेक घरे कोसळली आहेत. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास ५.३ रिश्टर स्केलचा पहिला भूकंपाचा धक्का बसला, तर ४.९ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप दुपारी चारच्या सुमारास जाणवला. बास मोहम्मद सरवरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांताच्या दक्षिणेकडील कदीस जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे आणि सर्वाधिक जीवितहानीही इथेच झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ५.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमा भागात १०० किमी खोलीवर होता. पेशावर, मानशेरा, बालाकोट आणि चारसादा यासह खैबर-पख्तूनख्वामधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तरेकडील गिलगिट-बाल्टिस्तान भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here