यंदा ९९ टक्के पाऊस पडणार : हवामान विभागाचा पहिला अंदाज जारी

379

The गडविश्व
मुंबई : यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे.
यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्याने ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. त्यामुळे सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे.
दरम्यान, जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केला आहे. हा पहिला अंदाज आहे. एखूण पावसाच्या 74 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. पाऊसमान चांगला होण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण गेले दोन वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली होते. आता थोडासा धोका कमी झाला आहे. तसेच वाढत असलेली महागाई, वाढते तापमान, अशातच पाऊसमान चांगला होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here