– तालुका अध्यक्षपदी श्रीमती चंद्रकला सयाम तर उपाध्यक्षपदी रमा काटलामी यांची निवड
The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना कोरची ची नुकतीच कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्षपदी श्रीमती चंद्रकला सयाम तर उपाध्यक्षपदी रमा काटलामी यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली कोरची तालुक्यात नर्सेस संघटनेची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला नवनिर्मित संघटना गडचिरोलीच्या अध्यक्षा श्रीमती विमल अंबाडकर, उपाध्यक्षा शेडमाके, सचिव विमल वाळके, कार्याध्यक्षा लता लिहीतकर, संघटक शोभा गेडाम उपस्थित होत्या. या दरम्यान कोरची तालुक्यातील नर्सेस भगिनींच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीमती. चंद्रकला सयाम कोरची, उपाध्यक्षपदी रमा काटलामी बोरी, सचिवपदी माधुरी कांबळे लेकुर बोरी , कोषाध्यक्षपदी दर्शना नेवारे, कार्याध्यक्षपदी कोमल रहाटे कोरची, सहसचिवपदी चंदा खोत मसेली, संघटकपदी दीक्षा धोंगडे, सदस्यपदी सीमा मरस्कोल्हे ,सपना उईके, माहेश्वरी दुधकुवर, दर्शना दडमल यांची निवड करण्यात आली.
दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांना भेट देऊन नर्सेस भंगिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली व नव्याने गठीत करण्यात आलेल्या संघटनेतील कार्यकरिणीला पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.