म्हाडा परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल

240

– 7 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या परीक्षा आता 31 जानेवारीपासून
The गडविश्व
मुंबई : म्हाडाच्या भरती परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून 7 फेब्रुवारी पासुन सुरु होणाऱ्या परिक्षा आता 31 जानेवापासून ऑनलाईन सुरु होणार आहे. 31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार आहे. 565 पदांसाठी ऑफलाईन होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे.
म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीवर सोपवण्यात आली आहे. टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. याआधी जीए सॉफ्टवेअर कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती. पण पेपर फुटीचा प्रकार उघडकीस आल्याने म्हाडाकडून ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र (hall Ticket ) डाऊनलोड करण्याकरिता म्हाडाच्या https.mhada.gov. in या संकेतस्थळावर 22 जानेवारी पासून https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरावी याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर 26 जानेवारी पासून मॉक लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211 या मॉक लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षेचे साधारण स्वरूप समजून घेता येणार असून ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here