– दोघांवर गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील मौशीचक शेतशिवारात स्थानिक पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शोधमोहीम राबवून १ लाख १२ हजार रुपये किंमतीचा १२ ड्रम मोहफुलाचा सडवा व दारू नष्ट केल्याची कारवाई मंगळवारी केली. याप्रकरणी दोघांवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौशीचक गावात अवैध दारूविक्री केली जाते. यामुळे दारूविक्री बंद असलेल्या अमिर्झा, भिकारमौशी, गिलगाव, कळमटोला, मुरमाडी आदी गावांतील मद्यपी दारू पिण्यासाठी येतात. दरम्यान मौशीचक शेतशिवारात नाल्यालगत हातभट्ट्या लावून दारू गाळली जात असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार गडचिरोली पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने शेतशिवारात धाड टाकून अवैध दारू अड्डे उध्वस्त केले. विशेष म्हणजे दारू गाळताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. यावेळी घटनास्थळी मिळून आलेला १ लाख १२ हजार रुपये किमतीचा २० ड्रम मोहफूलाचा सडवा व १०० लिटर मोहफुलाची दारू नष्ट केली. याप्रकरणी कवडू राघो सयाम व वासुदेव लहुजी गावडे या दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस कर्मचारी धनराज चौधरी, परशुराम हलामी, गडगल, तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.