मोहली च्या माँडेल स्कुलमधील १४५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार ५ शिक्षकांवर

123

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ९ सप्टेंबर : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने मोहली येथे सुसज्ज ईमारतीसह इंग्लिश मॉडेल स्कूल सुरु करण्यात आले. या शाळेतील उच्च दर्जाच्या शिक्षणामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा ही वाढला. मात्र मागील काही वर्षापासून शासन स्तरावर दोन शिक्षकांची नियुक्ती रखडली असल्याने मुख्याध्यापकासह शाळेतील केवळ ५ शिक्षक शाळेचा अध्यापणाचा भार सोसत आहेत.
धानोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने शासनाने धानोरा पासुन ९ किमी अंतरावर असलेल्या मोहली येथे सन २०१२ मध्ये इमारतीसह निवासाची सुविधा असलेल्या मॉडेल स्कूलची स्थापना केली. यात ६ ते १० वर्ग असून या शाळेवर शिक्षकानी विद्यार्थ्यावर घेतलेल्या परिश्रमामुळे शाळेत एकूण १४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत सध्या स्थितीत शाळेत मुख्याध्यापक एन. एस. नैतान, सहाय्यक शिक्षक एम .एस गद्देवार, एच.डी. वाघाडे, पि.एन.जिवतोडे, एच.एस.मेढें शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी मुख्यध्यापक इतर कामातच व्यस्त राहतात. मागील अनेक वर्षापासून शिक्षकाची मागणी होत असतानाही शिक्षकांच्या नियुक्ती बाबत शिक्षण विभाग उदासीन असल्याने कार्यरत पाच शिक्षकांना ईतर कामा सोबतच शालेय शिक्षणाचा भार सोसतानां तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील वर्ग सहावीला १५ विद्यार्थी सातवीला ४२, आठवीला १७, नववीला ३८, दहावीला ३२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत मुलामुलीनां ये-जा करण्याकरिता बसची मागणी करुणही बससुविधा उपलब्ध करून देण्यात न आल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यास सुरुवात केली आहे. परिणामी शालेय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चाललेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेण्यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांकरिता शासन स्तरावरून मॉडेल स्कूल ची मुली करता सुसज्ज वसतीगृह निर्माण केले आहे. तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थीनी या वसतीगृहात निवासी राहून शिक्षण घेतात. मात्र सदर वसतीगृहात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकडे शिक्षण विभाग शासनाने कानाडोळा केल्याने विद्यार्थ्यांची गडती लागलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here