मोठी बातमी : आरोग्य विभागाच्या गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला अटक

240

THE गडविश्व
बीड : आरोग्य गट ‘क’ पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून जिल्हा परिषद शाळेतून आणखी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर सेलने ही कारवाई केली आहे. पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाला अटक केली. शिक्षकाला शाळेतूनच ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव प्रल्हाद नागरगोजे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
शिक्षक उध्दव प्रल्हाद नागरगोजे आला अटक करण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये या शिक्षकाचा शोध घेत होते. शिरूर तालुक्यातील तितरवणीतून शिक्षक उध्दव प्रल्हाद नागरगोजेला अटक झाली.
बीड जिल्ह्यातील उध्दव प्रल्हाद नागरगोजे , प्रशांत व्यंकट बडगीर, डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के, नामदेव विक्रम करांडे इतक्या आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. वेगवेगळे अधिकाऱी आणि परीक्षा घेणाऱ्या आयटी कंपन्यांमधील काही लोकांना हाताशी धरून आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here