मोटारपंप व लोखंडी चॅनल चोरी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

712

– मालवाहु वाहनासह ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
वर्धा : मोटारापंप व लोखंडी चॅनल चोरी प्रकरणाचा छडा लावत चारचाकी मालवाहु वाहनासह ४ लाख २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई देवळी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मंगेश प्रकाश पाटमासे, देवानंद कवडूजी खेलकर, हर्षल रवींद्र खेकारे तिघेही रा. देवळी, दुशांत किसनाजी वाघाडे रा. पळसगाव, तसेच रूपेश मनोहर फटींग, हर्षल खेकोरे दोन्ही रा. देवळी असे आरोपींतांची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसा, शिवप्रसाद सुदामादास तिवारी रा. नगर परिषद ले आऊट देवळी यांनी ५ हॉर्सपावरची मोटारपंप चोरी गेल्याबाबत तसेच स्वप्नील मुन रा. विहीतपुरा ता. सेली यांनी ९ लोखंडी चॅनल चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्टेशन देवळी येथे ७ एप्रिल रोजी दाखल केली होती. सदर गुन्हयाचा तपास सुरू असतांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अज्ञात आरोपींचा छडा लावून गुन्हयातील चोरी गेलेली ५ हॉर्सपावरची मोटार किंमत २० हजार रूपये चा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला. याप्रकरणी मंगेश प्रकाश पाटमासे, देवानंद कवडूजी खेलकर, हर्षल रवींद्र खेकारे तिघेही रा. देवळी, दुशांत किसनाजी वाघाडे रा. पळसगाव यांना अटक करण्यात आली तर ९ लाखंडी चॅनल चोरी प्रकरणी रूपेश मनोहर फटींग, हर्षल खेकोरे दोन्ही रा. देवळी यांना अटक करून २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल तप्त करण्यात आला तसेच गुन्हयात चोरी करण्याकरिता वापरण्यात आलेली मालवाहु वाहन क्रमांक एमएच ३२ एजे १७४१ किंमत ४ लाख रूपये असा दोन्ही गुन्हयातील एकुण ४ लाख २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून मोटारपंप व लोखंडी चॅनल चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, पुलगावचे उपविभागीय पोलीस अधीकारी पाटील यांच्या मार्गदर्शनात परि. पोलीस अधीक्षक शफकतम आमना यांच्या निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार कुणाल हिवसे, उमेश गेडाम, अनिल तिवारी, दयाल धवणे, गणेश इंगळे पोलीस स्टेशन देवळी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here